Nashik : आयएसआयएसला आर्थिक मदत मिळवून देणाऱ्या व्यक्तीला एटीएसने केली अटक
Nashik : आयएसआयएसला आर्थिक मदत मिळवून देणाऱ्या व्यक्तीला एटीएसने केली अटक
img
दैनिक भ्रमर


नाशिक (चंद्रशेखर गोसावी) - दहशतवादी संघटना आय एस आय एसला विदेशातून फंड मिळवून देणाऱ्या एका व्यक्तीला नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाने तिडके कॉलनी परिसरातून अटक केली आहे.

यामुळे नाशिकचे दहशतवादी संघटनेबरोबर असलेले कनेक्शन उघडे झाले आहे परंतु नाशिकच्या दहशतवादी पथकाने ही कारवाई करून एक मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडे केले आहे. विशेष म्हणजे ही कारवाई केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नाशिक दौऱ्याच्या आधी एटीएसने उघड केल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

याबाबत उपलब्ध झालेली अधिक माहिती अशी की, नाशिक मधून दहशतवादी संघटनांचा कारभार चालतो आणि या कारभाराला काही प्रमाणामध्ये मदत होत असल्याचे अनेक प्रकार यापूर्वी देखील समोर आले आहेत तर नाशिक मध्ये काही दहशतवाद्यांच्या परिवाराचे संबंध असल्याच्या घटना या अलीकडच्या काळात समोर आल्या आहेत. असं सर्व असताना नाशिकमधून बंदी घालण्यात आलेल्या आयएसआयएस या संघटनेला विदेशातून फंड स्वरूपात आर्थिक मदत मिळून देण्याचा प्रकार देखील समोर आला आहे.

नाशिकच्या एटीएस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार शहरातील तिडके कॉलनी परिसरातील एका ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तीकडून आय एस आय एसला या दहशतवादी व केंद्र सरकारने बंदी घातलेल्या संघटनेसाठी विदेशातून फंड स्वरूपात आर्थिक मदत मिळत असल्याचे माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधाराने नाशिकच्या एटीएस पथकाने मागील काही दिवसांपासून सातत्याने लक्ष ठेवून ही कारवाई केली असून यामध्ये एका मुस्लिम व्यक्तीला आज दुपारी तिडके कॉलनी येथील घरावर छापा टाकून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

नाशिकचे दहशतवादी पथकाकडून आता या व्यक्तीची चौकशी सुरू झाली असून या प्रकरणी आंतरराष्ट्रीय रॅकेटचा काही भाग समोर येण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दोन दिवसा वर नाशिक दौरा आहे आणि मागील काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर येऊन गेले आहेत अशा परिस्थितीमध्ये एटीएसने केलेल्या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group