पुणे : पुण्यातील गुन्हेगारी काही संपायचं नाव घेत नाही आहे. त्यातच आता भाईगिरीच्या वादातून कानाचा लचका तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात ही घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार, तीन मित्र पुण्यातील स्वारगेट परिसरात असलेल्या मार्केट यार्ड रोडवर गप्पा करत होते. यावेळी एका मित्राने मी मोठा भाई असल्याचं सांगितलं यावरु दुसऱ्या मित्राला राग आला आणि त्याने तू खूप मोठा भाई झालास का? असा प्रश्न विचारला. हे सगळं सुरु असताना दुसऱ्या मित्राचा राग अनावर झाला आणि त्याने थेट हल्ला करत कानाचा लचका तोडला, डोक्याला दगडाने मारहाण केली आणि हा मित्र एवढ्यावरच न थांबता दारूची फुटलेली बाटली घेऊन मारण्यासाठी फिर्यादीचा पाठलाग केला. यावेळी जखमी झालेला मित्राने परिसरातून पळ काढल्याने तो थोडक्यात बचावला.
याप्रकरणी हर्ष कैलास कांबळेवय 20 यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून सौरभ नितीन आदमाने (वय 24) आणि पवन काळे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.