नाशिकरोडला स्पाच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय उद्ध्वस्त; ४ तरुणींची सुटका
नाशिकरोडला स्पाच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय उद्ध्वस्त; ४ तरुणींची सुटका
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (प्रतिनिधी): येथील पासपोर्ट कार्यालयाच्या वर विवा स्पा नावाखाली देहविक्रीची व्यवसायावर उपनगर पोलीसांनी छापा टाकला असता, यावेळी चार तरुणीची सुटका करण्यात आली तर दोन इसमाना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले की, नाशिक पुणे महामार्गावरील स्टार झोन मॉल मधील दुसऱ्या मजल्यावर विवा स्पा सुरु होते. या ठिकाणी स्पा च्या नावाखाली मालक मयुर देव, स्पा चा व्यवस्थापक अंकित उर्फ गोलू रामदास साहु (वय २४) आणि मदतनीस रुपेश कुमार बरार (वय २४) हे संगनमत करुन तरुणींकडून देहविक्रीचा व्यवसाय करुन घेत होते.


याबाबत पोलीसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यांना या ठिकाणी चार तरुणी मिळुन आल्या. पोलीसांनी तरुणींची सुटका केली तर साहु आणि बरार यांना ताब्यात घेतले आहे. स्पा चा मालक मयुर देव याला अद्याप ताब्यात घेतले नसल्याचे पोलीसांनी सांगितले.

 या कारवाईत उपनगर गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी आदी सह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group