नाशिक :- आठवीतील विद्यार्थिनीने शाळेच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना आज शहरात घडली.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, शहरातील एका नामांकित शाळेत इयत्ता आठवीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीने आज सकाळी अचानक शाळेच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत तिचा पाय फ्रॅक्चर झाला असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिला असलेले व्यसन शाळेतील शिक्षकांना समजल्याने घाबरलेल्या मुलीने हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. तिला अभ्यासाच्या तणावातून पण हे पाऊल उचलले की आणखी काही कारण आहे, हे तिने पोलिसांना जबाब दिल्यानंतरच स्पष्ट होईल.
तिचे पालकही बोलण्याच्या मनःस्थितीत नसल्याने पोलिसांनी अधिक बोलणे टाळले.