नाशिक (प्रतिनिधी) :- काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा दि. 14 रोजी नाशिकमध्ये येत आहे. या निमित्ताने दुपारी 1 वाजेपासून ते रोड शो संपेपर्यंत नाशिकमधील द्वारका ते त्र्यंबक नाक्यापर्यंतच्या अनेक भागांत वाहनांना प्रवेशबंदी राहील. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे.
द्वारका सर्कलपासून रोड शो सुरू होऊन सारडा सर्कल, फाळके रोड, दूध बाजार, त्र्यंबक पोलीस चौकी, खडकाळी सिग्नल, शालिमार चौक येथील माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पुतळा येथे वंदन करून पुढे डॉ. आंबेडकर पुतळ्यास अभिवादन केले जाईल व तेथून त्र्यंबक नाका येथे रोड शोचा समारोप होईल. रोड शोमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांसह असंख्य नागरिक सहभागी होणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून या मार्गावरील विविध रस्त्यांवर वाहनबंदी करण्यात आली आहे.
या रस्त्यांवर वाहनबंदी
द्वारका सर्कल ते सारडा सर्कल, फाळके रोड ते दूध बाजार, त्र्यंबक पोलीस चौकी ते खडकाळी सिग्नल, शालिमार चौक ते डॉ. आंबेडकर पुतळा जुने सीबीएस सिग्नल व जुने सीबीएस सिग्नल ते मोडक सिग्नल (त्र्यंबक नाका).
असे आहेत पर्यायी वाहतूक मार्ग
ट्रॅक्टर हाऊस ते द्वारका सर्कल मार्गाने जाणारी वाहने ट्रॅक्टर हाऊस, तिगरानिया रोड, मारुती वेफर्स या मार्गाने इतरत्र जातील.
काठे गल्ली सिग्नलकडून द्वारका सर्कलकडे येणार्या वाहनांनी काठे गल्ली सिग्नल, नागजी सिग्नल, भाभानगर, मुंबई नाका मार्गे इतरत्र जायचे आहे.
मेनरोडवरील बादशाही कॉर्नर ते दूध बाजार ही वाहतूक तिवंधा चौकातून इतरत्र जाईल.
मोडक सिग्नलकडून (त्र्यंबक नाका) दूध बाजाराकडे येणारी वाहने गडकरी चौक सिग्नलमार्गे इतरत्र जातील.
खडकाळी सिग्नल ते शालिमार ही वाहतूक खडकाळी सिग्नल ते अण्णा भाऊ साठे पुतळा, त्र्यंबक नाका मार्गे इतरत्र वळविण्यात आली आहे.
सांगली बँकेकडून वाहनचालकांनी शालिमारकडे न जाता धुमाळ पॉईंटमार्गे इतरत्र जायचे आहे.
गडकरी सिग्नल ते सारडा सर्कलकडे जाणारी वाहतूक गडकरी सिग्नलकडून मुंबई नाका मार्गे इतरत्र वळविण्यात आली आहे.
हे निर्बंध दि. 14 रोजी दुपारी 1 वाजेपासून रोड शो संपेपर्यंत अमलात राहतील, याची वाहनचालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे