"इतक्या" कोटीचं सोनं लपवलं होतं कपड्यांमध्ये; मुंबई विमानतळावर फुटलं बिंग
img
DB
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई  सीमा शुल्क विभागाने कपड्यांमध्ये लपवून सुरू असलेल्या सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. एकाच प्रकरणात १.४६ कोटी रुपयांच सोनं जप्त करण्यात आलं आहे, तर पाच वेगवेगळ्या प्रकरणात एकूण २.५२ किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सीमा शुल्क विभागाला सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. कपड्यांमध्ये लपवून, दागिन्याच्या स्वरूपात आणि ट्रॉली बॅगमध्ये लपवून ही तस्करी सुरू होती.
mumbai | crime | gold |
इतर बातम्या
Join Whatsapp Group