लोकसभा निवडणुक : रायगडमध्ये ८ हजार ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
लोकसभा निवडणुक : रायगडमध्ये ८ हजार ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
img
Dipali Ghadwaje
एकीकडे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून प्रचारही शीगेला पोहोचला आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरु झाले आहे.लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७.०० वाजेपासून सुरू झाले आहे.  

दरम्यान रायगडमध्ये तब्बल ८ हजार मतदारांनी मतदानावर बहिस्कार टाकल्याचं समोर आलंय. बाळगंगा प्रकल्पग्रस्त गावातील मतदारांनी मतदान न करण्याचं ठरवलं आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. परंतु, गावकऱ्यांनी कुणाचंही ऐकलं नाही.

रायगडमध्ये १३ वर्षांपूर्वी बाळगंगा धरणाचे काम सुरू झाले होते. काम ८० टक्के होऊनही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group