अजित दादांच्या 'त्या' नेत्यांना शरद पवार गटात नो एंट्री; घरवापसीसाठी पवारांनी ठरविल्या 'या' अटी
अजित दादांच्या 'त्या' नेत्यांना शरद पवार गटात नो एंट्री; घरवापसीसाठी पवारांनी ठरविल्या 'या' अटी
img
Jayshri Rajesh
लोकसभा निवडणुकीत १० जागा लढवून ८ जागा जिंकणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. लोकसभेत अजित पवार गटाला बसलेला धक्का आणि त्यानंतर महायुतीत एकटे पडलेले अजितदादा ही स्थिती पाहता त्यांच्याकडचे बरेच आमदार माघारी फिरण्याच्या तयारीत आहेत. त्यातच शरद पवारांनी सरसकट सगळ्याच आमदारांच्या घरवापसीला विरोध नसल्याचं म्हणत सूचक विधान केलं होतं. 

ज्यांच्या घरवापसीनं पक्षाला फायदा होईल, त्यांचं स्वागत आहे. पण ज्यांच्या येण्यामुळे पक्षाचं नुकसान होऊ शकतं, त्यांना पुन्हा घेणार नाही,अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. १० वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये गेलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील पुन्हा स्वगृही परतल्या आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात पवारांनी घरवापसीबद्दल भूमिका स्पष्ट केली.

भूतकाळात पक्षाचं नुकसान केलेल्या आमदारांना परत घेणार नाही. पण ज्यांनी केवळ पक्षाचा फायदा स्वत:साठी करुन घेतला, त्यांना पुन्हा पक्षात स्थान देण्यात येणार नाही, असं पवार म्हणाले. पक्षाच्या नेते, पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन आमदार आणि नेत्यांच्या घरवापसीबद्दलचा निर्णय घेतला जाईल. त्यासाठी कार्यकर्त्यांचं मत विचारात घेतलं जाईल, अशी पुस्तीही पवारांनी जोडली.

विधानसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी राहिलेला असताना शरद पवारांनी केलेलं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. अजित पवार गटातील बऱ्याच आमदारांना स्वगृही परतण्याची इच्छा आहे.विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्यास अजित पवारांना धक्का बसू शकतो.
इतर बातम्या
Join Whatsapp Group