अंबड एमआयडीसीत कंपनीला भीषण आग
अंबड एमआयडीसीत कंपनीला भीषण आग
img
DB
नाशिक : आज पहाटेच्या सुमारास अंबड औद्योगिक वसाहतीत  भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.


ब्लॅक अ‍ॅक्शन हिरो' अभिनेते रिचर्ड राउंडट्री यांचे निधन; वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अंबड औद्योगिक वसाहतीत घडली. अंबड एमआयडीसीतील सुपर स्किल इंडिया प्रा. लि. बि. डब्ल्यू 24/25, नामको बँकेशेजारी असलेल्या इथेनॉल तयार करणाऱ्या कंपनीला अचानकपणे आग लागल्याने धावपळ उडाली.

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अग्निशमन दलाला तातडीने फोनद्वारे घटनेची माहिती कळवली. यानंतर अग्निशमन दलाचा एक बंब तेथे आला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाचे कर्मचारी एम. एस. सोनवणे, के. के. पवार व आय. आय. काझी यांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group