अजित पवार यांच्या तब्येतीबाबत खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली
अजित पवार यांच्या तब्येतीबाबत खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली "ही" माहिती
img
दैनिक भ्रमर
गेल्या दोन दिवसांपासून सामाजिक कार्यक्रमांत उपस्थित नसल्याने पुन्हा एखदा अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र या   

चर्चांना खा. प्रफुल्ल पटेल यांनी एक ट्विट करत ब्रेक लावला आहे. ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे कि, डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता डेंग्यू हा चिंतेचा विषय बनला आहे. तसेच डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे. अजित पवारांची तब्येत अचानक बिघडल्याने चाचणी केली अजित पवारांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

अजित पवारांना शनिवारी डेंग्यूचे निदान झाले आहे. डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अजित पवार नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत. अजित पवार पूर्ण बरे झाले की ते पुन्हा जनतेच्या सेवेसाठी परततील. अजित पवारांवर सध्या घरातच उपचार सुरू आहेत. मराठा आरक्षणवरून काल त्यांचा बारामतीचा दौरा रद्द झाला.

सकल मराठा समाजाच्यावतीने पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आल्याने त्यांच्या दौऱ्यासाठी देखील मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group