Nashik Crime : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
Nashik Crime : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
img
दैनिक भ्रमर

नाशिक (प्रतिनिधी) :- नोकरी लावून देतो व लग्न करण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की गणेश गोविंदराव झेंडे (रा. टाकळी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांची व पीडित महिलेची एकाच परिसरात राहत असल्याने ओळख होती. पीडितेला नोकरी लावून देतो, असे सांगत त्याने तिचा विश्‍वास संपादन केला. नंतर त्याने ऑगस्ट 2021 पासून ते जुलै 2023 पर्यंत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.


नंतर त्याने तिला जातिवाचक शिवीगाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने सरकारवाडा पोलीस ठाणे गाठत आपबिती कथन केली. पीडितेच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्‍वर धुमाळ करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group