धनंजय मुंडेंचा 'खास' माणूस फुटला ; एका ओळीचं पत्र लिहीत दिला राजीनामा
धनंजय मुंडेंचा 'खास' माणूस फुटला ; एका ओळीचं पत्र लिहीत दिला राजीनामा
img
दैनिक भ्रमर
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. राज्यातील महायुतीमधील भाजप पक्षाने आता पर्यंत उमेदरांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहे. यावरून शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अशात अजित पवार गटातील नेत्याने राजीनामा देत नाराजी व्यक्त केली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटातील नेते बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोनावणे यांनी सुनील तटकरे यांना पत्र लिहून राजीनामा सादर केला आहे.

'ती' जागा भाजपचीच, उमेदवार आमच्याच चिन्हावर लढणार ; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

बजरंग सोनवणे यांनी पत्रात नेमकं काय लिहिले आहे…

“मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा सादर करीत आहे” असा एका ओळीचा मजकूर या पत्रावर लिहिला आहे. तसेच या राजीनाम्याची प्रत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देखील सुपूर्द करण्यात आली आहे.

शरद पवार गटात करणार प्रवेश ?

मिळलेल्या माहितीनुसार, आज बजरंग सोनवणे यांचा पक्ष प्रवेश होईल. ज्योती मेटे यांनी शासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. त्या आज शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. आज त्यांचा पण आज शरद पवार गटात पक्ष प्रवेश होऊ शकतो. पक्ष ज्या जागा लढवणार आहे त्याचा सगळा आढावा शरद पवारांनी घेतला आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group