"कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी......"; अजित पवारांचे मोठं विधान
img
Dipali Ghadwaje
एससीईआरटीने नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शालेय शिक्षणाच्या पुस्तकात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. राज्य सरकारकडून मनाचे श्लोक आणि भगवद्गीता तर भारतीय मूल्यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्यात येणार आहे. या प्रस्तावावर आक्षेप, हरकती आणि सूचना देखील मागवण्यात आल्या आहे. मात्र त्याआधीच वादाला तोंड फुटलं आहे. एनसीईआरटीईच्या या प्रस्तावाला राष्ट्रवाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केलाय. तर शरद पवार यांनी यावरून नाराजी व्यक्त केली. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.

"काही ठिकाणी मराठा आणि मराठेत्तर अशा स्वरुपाची निवडणूक झाली. जग, देश कुठे चाललाय आणि आपण कुठे जातीपातीमध्ये अडकून बसतोय. आपण शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा आदर्श समोर ठेवून पुढे जायचं म्हणतो. मनुस्मृतीबाबत छगन भुजबळंनी सांगितले. पण आपण सरकारमध्ये असे पर्यंत कुठल्यालाही परिस्थितीत तसं होऊ देणार नाही. याची तुम्ही काळजी करु नका.

ज्या विचारधारेतून आपण पुढे जातोय त्याला कुठेतरी ठेच लागेल असं करणार नाही. मग त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठीमागे हटणार नाही. कुणीतरी पुड्या सोडायचं काम करतंय," असे अजित पवार यांनी म्हटलं.
 
शालेय अभ्यासक्रमात मुलांना भारतीय मूल्यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा वापर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी संविधान दहन करण्यासाठी मनुस्मृती आणली जाते आहे असा आरोप केला आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या कार्यकारिणीची बैठक बोलताना अजित पवारांनी महत्त्वाचे विधान केले आहे. सत्तेत असेपर्यंत मनु्स्मृतीचा प्रकार होऊ देणार नाही, असे अजित पवारांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group