ईडीने केलेल्या कारवाईनंतर रोहित पवार परदेशातून आज मुंबईत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत ईडीच्या या कारवाईवरुन अजित पवार यांच्याकडे बोट दाखवत आरोप केला.
“गेल्या सात दिवसात दिल्लीत कोण गेलं होतं? भाजपचं कोण गेलं होतं? आणि अजितदादा मित्र मंडळाचं कोण दिल्लीत गेलं होतं? त्यावरून या छापेमारी मागच्या काही गोष्टी समजून येईल”, असे मोठे वक्तव्य रोहित पवारांनी केले. ते पुढे म्हणाले “मी चूक केली असती तर मी परदेशातून आलो नसतो. नाहीतर अजितदादांबरोबर भाजपात जाऊन बसलो असतो. पण आमच्यासाठी विचार महत्त्वाचा आहे”.
त्यांच्या या वक्तव्याबाबत अजित पवारांना विचारले असता त्यांनी रोहित पवार बच्चा आहे, बच्च्याबद्दल जास्त बोलायचे नसते. त्याच्या प्रश्नाला मी उत्तरे द्यावी एवढा काय तो मोठा झालेला नाही. माझे कार्यकर्ते, प्रवक्ते उत्तर देतील”, अशी खोचक प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
यावेळी आणखी एका पत्रकाराने अजित पवारांना रोहित पवार यांच्याबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला त्यावर त्यांनी “मी तुम्हाला मागेच सांगितलं ना, मी सोम्या गोम्यांना उत्तरे देत नाही”, अशी प्रतिक्रिया दिली.