उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी थकबाकीदार छगन भुजबळांनी उचलले
उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी थकबाकीदार छगन भुजबळांनी उचलले "हे" मोठे पाऊल
img
Dipali Ghadwaje
नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून काही जागांवर निर्णय झाला नाही. त्यात नाशिकमधील शिवसेनेची जागा आहे. या जागेवर एकीकडे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी आपला दावा कायम ठेवला आहे. त्याचवेळी भाजपकडून नाशिकची जागा लढवावी, अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत. परंतु ही जागा आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. 

त्यासाठी छगन भुजबळ यांनी तयारी सुरु केली आहे. भुजबळ कुटुंबियाकडून नाशिक जिल्हा बँकेचे कर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. वन टाइम सेटलमेंट योजनेत हे थकीत कर्ज भरण्यात येतंय अशी माहिती आहे. बँकेच्या थकीत कर्ज प्रकरणी उमेदवारी मिळाल्यानंतर कोणी तक्रार घेऊ नये यासाठी थकीत कर्ज भरण्यास सुरवात केल्याची देखील चर्चा आहे. उमेदवारीच्या शक्यतेमुळे भुजबळ खबरदारी घेत असल्याची चर्चा आहे. 

छगन भुजबळ नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आज दुपारी किंवा उद्यापर्यंत त्यांच्या नावाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधकांना कर्जावरून आरोप करण्याची आयती संधी मिळू नये याची खबरदारी घेतली जाते. जिल्हा बँकेच्या कर्जाची आठ ते दहा वर्ष जी टांगती तलावर आहे त्या कर्जाची थकबाकी पूर्ण करण्याकडे भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लक्ष दिले आहे.

51 कोटीची थकबाकी
छगन भुजबळ कुटुबीयांकडून नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज फेडण्यास सुरुवात झाली  आहे. नाशिक जिल्हा बँकेकडू थकबाकी भरण्यासाठी वारंवार नोटीस पाठवण्यात आली होती.  आतापर्यंत  पहिल्या टप्प्यात  भुजबळ कुटुंबियांनी साडे सहा कोटी भरले आहेत. उरलेली रक्कम टप्प्याटप्प्यानं फेडणार आहे असं कळतंय. वन टाइम सेटलमेंट योजनेत हे थकीत कर्ज भरण्यात येतंय अशी माहिती आहे. नाशिक जिल्हा बँकेतून आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर कारखान्यासाठी 2011 साली भुजबळ कुटुंबीयांनी नाशिक जिल्हा बँकेकडून 28 कोटींचं कर्ज घेतलं होतं. व्यजाची रक्कम वाढ जाऊन हे कर्ज 51 कोटीपर्यंत गेले होते. 

नाशिक जिल्हा बँक अडचणीत असल्याने थकबाकीदारांना नोटीसा बजावल्या आहेत. भुजबळ कुटुंबियांच्या मालकी असलेल्या दाभाडी येथील आर्मस्ट्रॉंग सारख कारखान्यावर असलेल्या 51 कोटी 66 लाख थकीत कर्ज वसुलीसाठी काही दिवसापूर्वी  नोटीस पाठवण्यात आली. जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी दाभाडी येथे जाऊन 'आर्म स्ट्रॉंग ' च्या गेटवर काही दिवसापूर्वी ही नोटीस चिटकवली होती. त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर भुजबळ कुटुंबीयांकडून ही खबरादारी घेतल्याची माहिती आहे. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group