उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट ; म्हणाले वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत.....
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट ; म्हणाले वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत.....
img
Dipali Ghadwaje
मुंबई : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा राजकीय भूकंपानं हादरलं. गेल्या दोन वर्षांत राज्यातील जनतेनं अनेक राजकीय भूकंप अनुभवले आहेत. पण राष्ट्रवादीतील या फुटीचं कट-कारस्थान नेमकं कसं रचलं गेलं? कुणालाच कसा सुगावा लागला नाही?  याबाबत आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.

"वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असताना, मास्क आणि टोपी घालून वेश बदलून दिल्लीला जायचो", असा खळबळजनक गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. 

एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार , थोरल्या पवारांची साथ सोडून भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच्या महायुतीतील सहभागाबाबतचा किस्सा सांगितला आहे. दिल्लीत पत्रकारांसोबत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अध्यक्ष अजित पवार यांचा गप्पांचा फड रंगला होता. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना अजित पवारांनी महायुतीसोबत जाण्यापूर्वी काय-काय आणि कसं-कसं जुळवून आणलं? याबाबत अनेक खळबळजनक खुलासे केले. 

अजित पवारांच्या वेशांतराची इन्साईड स्टोरी 

मास्क आणि टोपी घालून वेश बदलून दिल्लीला जायचो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. दिल्लीत पत्रकारांशी त्यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये कशी सहभागी झाली? याबद्दलचे खुलासे केले. महायुतीत सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दहा वेळा बैठका झाल्या होत्या, असंही अजित पवार यांनी सांगितलं. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group