आमदार निलेश लंके यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
आमदार निलेश लंके यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
img
दैनिक भ्रमर
आमदार निलेश लंके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या.

आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषद घेतली. त्याआधी खा. अमोल कोल्हे आणि मनसेला सोडचिठ्ठी दिलेले वसंत मोरे हे दोघेही पक्ष कार्यालयात दाखल झाले. निलेश लंके आणि वसंत मोरे हे दोघेही राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार अशी शक्यता होती. त्याप्रमाणे निलेश लंके यांनी प्रवेश केला, मात्र वसंत मोरे यांनी प्रवेश न करता, ते माघारी परतले.  

पारनेरचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत गेले होते. निलेश लंके यांना अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवायची आहे. मात्र अजित पवार ज्या महायुतीत आहेत, त्यामध्ये नगरची जागा भाजपकडे गेली आहे, त्याठिकाणी भाजपने सुजय विखे यांना पुन्हा तिकीट दिलं आहे. त्यामुळे नाराज असलेले निलेश लंके यांनी अजितदादांची साथ सोडून शरद पवारांच्या गटात प्रवेश केला. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group