बारामती लोकसभेबाबत विजय शिवतारे यांनी आपली भूमिका केली जाहीर; म्हणाले गेली 40 वर्ष आम्ही...
बारामती लोकसभेबाबत विजय शिवतारे यांनी आपली भूमिका केली जाहीर; म्हणाले गेली 40 वर्ष आम्ही...
img
दैनिक भ्रमर

बारामती लोकसभा मतदार संघाबाबत शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी भूमिका जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन वेळा झालेल्या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वेगळी भूमिका त्यांनी आज मांडली. बारामतीमध्ये अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी जाहीर केली. १२ एप्रिलला १२ वाजता आपण लोकसभेचा अपक्ष अर्ज भरणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केले. यामुळे बारामतीमध्ये तिरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या लढाईत आता विजय शिवतारे आले आहेत.

विजय शिवतारे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर लोकसभा लढवण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, आज संपूर्ण 6 विधानसभा मतदार संघातील सर्वांना बोलावले होते. सर्व प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली.

ते म्हणाले, मी 2008 साली मुंबईवरुन पुरंदरला आलो. मी आमदारकी लढण्यासाठी इथं आलो. मी आमदारकी लढण्यासाठी इथं आलो. यामुळे जेव्हा मी आलो तेव्हा सर्व तरुणांनी माझी निवडणूक हातात घेतली होती.

लोकसभेसाठी आता लोक सांगत आहेत की माघार घेऊ नका. लोक मला कानात सांगतात ही त्यांची भीती आहे. यामुळे आता पर्याय हवा आहे. मतदार संघातून पवार नावाची हुकुमशाही संपवण्यासाठी आता माझे धर्मयुद्ध आहे. मोठे मोठे राजकीय पुढारी सांगत होते की मी काय करणार आहे. पण मी आमदार झालो तेव्हा 25 हजार मतांनी मी जिंकलो. सगळ्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला.

विजय शिवतारे यांनी सांगितले की, जाहीरपणे नाही तर मनातून सर्व पक्षीय नेते माझ्यासोबत आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनाही सांगतो की त्यांनी मला आशीर्वाद द्यावे. अनेक लोक माझ्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीचे लोक देखील माझ्या समोर आहे.

गेल्या 40 वर्षांपासून लोक पवारांचा मत देत आले. सुप्रिया सुळे यांनी
संसद रत्न पुरस्कार मिळाला तेव्हा त्या म्हणाल्या की माझी 98 टक्के हजेरी लोकसभेत आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी मतदारसंघात 2 टक्के तरी काम केले आहे का? असा गंभीर आरोप त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केला. अजित पवार यांचे राजकारण स्वार्थाचे आहे. आता 1 तारखेला सभा घेणार आहे. माझी लढाई म्हणजे जन सामन्यांची लढाई आहे. यामुळे या सभेला 50 ते 60 हजार लोकांची उपस्थिती असणार आहे. लोक त्यांना आता कंटाळले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group