शिरुरमधील महाविकास आघडीचे उमेदवार अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे यांनी प्रचार सभा घेतली. दरम्यान सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांनी केलेल्या टीकेला सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिले.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आपला पक्ष फुटला, चोरला, वगैरे वगैरे सुरू आहे, पण मी आज तेच म्हणते, प्यार से मांगा होता ना सबकुछ दे देते. नाती तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडायला ताकद लागते. मंत्री पद महत्वाचं की निष्ठा महत्वाची? हे तुम्हीच सांगा, अशी विचारणा करत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांनी केलेल्या मी त्यांच्या पोटी जन्माला आलो असतो वक्तव्यावर पलटवार केला आहे.
दरम्यान त्यांनी सांगितले की, आता मला त्यांचा स्वभाव माहीत आहे. तुम्हीच तुलना करा ना? कोणाला काय मिळालं याचा हिशोब करा. मला काय मिळालं आणि दादांना काय काय मिळालं. सगळं तुमच्या समोर आहे. सगळं स्पष्ट होईल. खूप सोप्प उत्तर आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शिरूर लोकसभेचा आपला उमेदवार एक नंबरचा आहे. अमोल दादा माझ्या भावासारखा आहे. आपल्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, पण आता आपण मुक्त झालो आहोत. पुत्री प्रेमाचा पण आरोप केला गेला, असेही त्या म्हणाल्या.